आवाहन

Monday, April 28, 2014

संत निवृत्तीनाथ समाधी (जेष्ठ वद्य १२ शके १२१६)

संत निवृत्तीनाथ समाधी (जेष्ठ वद्य १२ शके १२१६)

सहसमुदायेसी उठावे सारंगधरा | हरी हरेश्वरा जाऊ आतां ||१||
उठले वैष्णव आणि हृषीकेशी | आले त्र्यंबकासी निवृत्तीराज ||धृ||
एकादशी व्रत वद्य जेष्ठमासी | उत्सव निवृत्तीसी देवें केला ||३||
द्वादशी पारणें सोडितां वैष्णव | समारंभ देव करीतसे ||४||
राहिली ते शक्ती गळालें शरीर | देह अहंकार त्यागीयेला ||५||
कोणाची करावी पूजा कोणे कोणा | अवघें नारायणा करणें येथें ||६||
नामा म्हणे देवा मुक्ताईचि गती | सांडिलें निवृत्ती शरीरासी ||७||

 sant nivrutti nivruttinath nath samadhi sohala sahasamudayesi uthave sarangadhara hari hareshwara jau aata

No comments:

Post a Comment