आवाहन

Wednesday, April 9, 2014

गड्यांनो राजा की रे झाला । कृष्ण सिंहासनी बैसला ॥धृ||


 पांवा मोहरी घोंगडी । आम्हीं खेळूं यमुने थडी । नाचा पाऊला देहूडी । कृष्ण आमुचा की रे गडी ||२|| 



खेळू  हुतुतू हुंबरी  । थडक हाणों  टिरीवरी । आतां  चालिला दळभारी । आमुचें  यशोदेचा हरी ||३||



कुस्ती खेळतां  कासाविसी । शेबुंड खरकटे नाकासी । कडे घेउ सावकाशी । आतां बहु भितों यासी ||४||



आम्ही तुम्ही सवें जाऊ । गाई वळावया जाऊ । त्याचे मानेत बुक्या देऊ । जवळी जावयासी भिऊ ||५||



नामा म्हणे चला जाउ । हात जोडोनी उभें राहुं । पाया पडुन मागुन घेऊ । जनींवनीं तोचि कृष्णचि ध्याऊ ||६||



gadyanno raja ki re zala krushna sinhasani baisala pava nama

2 comments: