गुरूकृपे मज बोलविलें देवें । होईल हें घ्यावें हित कांहीं ।।१।।
सत्य देवें माझा केला अंगीकार । आणीक विचार नाहीं दुजा ।।धृ।।
सत्य देवें माझा केला अंगीकार । आणीक विचार नाहीं दुजा ।।धृ।।
होई बळकट घालुनियां कास । हाचि उपदेश तुज आतां ।।३।
सडा संमार्जनं तुळसी वृदावंन । अतीतपुजन ब्राम्हणांचे ।।४।।
वैष्णवांची दासी होई सर्वभावे । मुखी नाम घ्यावे विठोबाचे ।।५।।
पुर्णबोध स्रीभ्रतारसंवाद । धन्य जिही वाद आईकिला ।।६।।
तुका म्हणे आहे पाङुरंगकथा । तरेल जो चित्ता धरील कोणी ।।७।।
अभंग क्र.३५१३(शिरवळकर )
No comments:
Post a Comment