आवाहन

Monday, April 28, 2014

कान्होबा निवडीं आपुलीं गोधनें ||धृ||
पांच पांच पोळ्या तीन भाकरी | दीड कानवला एक पुरी |
आम्हा धाडिलें वैल्या दुरी | आमची ठकऊन खाल्ली शिदोरी ||२||
परियेसी शारंगधरा | तुझा बैल चुकला मोरा |
सांगुं गेलों तुझ्या घरा | पाठी लागला तुझा म्हातारा ||३||
परियेसी हृषीकेशी | गाई म्हशींचे दुध पिशी |
वासरे प्याली म्हणून सांगशी | उद्या ताक नाहीं आम्हाशी ||४||
कान्होबा ओढाळ तुझ्या गाई | होत्या नव्हत्या कळंबा ठाई |
शिव्या देती तुझी आई ||५||
विष्णुदास नामा साहे | देवा तूंचि बाप माये |
अखंड माझें हृदयी राहें ||६||

kanhoba nivadi aapuli godhane 

No comments:

Post a Comment