श्री ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठ
अभंग क्र.२७
सर्वसुख गोडी साही शास्त्रे निवडी । रिकामा अर्धघडी राहू नको ॥१॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिवीण ॥२॥
नाममंत्र जप कोटी जाईल पाप । कृष्णनामी संकल्प धरुनि राहे ॥३॥
निजवृत्ती काढी सर्व माया तोडी । इंद्रिया सवडि लपो नको ॥४॥
तीर्थव्रती भाव धरि रे करुणा । शांति दया पाहूणा हरि करी ॥५॥
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान । समाधि संजीवन हरिपाठ ॥६॥
हरि मुखें म्हणां हरि मुखें म्हणां | पुण्याची गणना कोण करी ||धृ||
हरि मुखें म्हणां हरि मुखें म्हणां | पुण्याची गणना कोण करी ||धृ||
No comments:
Post a Comment