भजन घाली भोगावरी ।
अकर्तव्य मनीं धरी ।।१।।
धिग त्याचें साधुपण ।
विटाळूनी वर्ते मन ।।धृ।।
नाहीं वैराग्याचा लेश ।
अर्थचाड जीवीं आस ।।३।।
हें ना तैसें झालें ।
तुका म्हणे वांयां गेलें ।।४।।
अभंग क्र.१६९(शिरवळकर)
bhajan ghali bhogavari akartavya mani dhari tukaram marathi abhang sant
No comments:
Post a Comment