गरुडाचे वारिके कासे पीतांबर | सावळे मनोहर कै देखेन ।।१।।
बरविया बरवंटा घनमेघ सावळा | वैजयंतीमाळा गळा शोभे ।।धृ।।
मुकुट माथा कोटी सूर्याचा झळाळ | कौस्तुभे निर्मळ शोभे कंठी ।।३।।
ओतीव श्रीमुख सुखाचे सकळ | वामांगी वेल्हाळ रखुमादेवी ।।४।।
उद्धव अक्रूर उभे दोहीकडे | वर्णिती पवाडे सनकादिक ।।५।।
तुका म्हणे नव्हे आणिकासारिखा | तोचि माझा सखा पांडुरंग ।।६।।
अभंग क्र.१८(शिरवळकर)
garudache varike kase pitambar savale savle manohar kai dekhen tukaram marathi abhang sant
No comments:
Post a Comment