पुढें गेले त्यांचा शोधीत मारग | चला जाऊ माग घेत आम्ही ||१||
वंदू चरणरज सेवूं उष्टावळी | पूर्वकर्मा होळीं करूनियां ||धृ||
अमुप हें गांठीं बांधू भांडवल | अनाथा विठ्ठल आम्हा जोगा ||३||
अवघे होती लाभ एका या चिंतनें | नामसंकीर्तनें गोविंदाच्या ||४||
जन्ममरणाच्या खुंटतील खेपा | होईल हा सोपा सिद्ध पंथ ||५||
तुका म्हणे घालू जीवपणा चिरा | जाऊ त्या माहेर निजाचिया ||६||
अभंग क्र.८ (शिरवळकर)
pudhe gele yancha shodhit marag chala jau mag ghet aamhi
No comments:
Post a Comment