श्री हनुमंत जन्मकाळ अभंग क्र.२
आनंदोनी म्हणे राया धन्य केलें | इच्छिले सोहळे पुरवीन ||१||
यज्ञाचा आरंभ करीं लवलाही | पुसोनी आचार्या वसिष्ठासी ||२||
सर्व ऋषिजन मिळाले सकळ | मंत्रांचा कल्लोळ करिताती ||३||
नामा म्हणे शृंगी मुखात्वे शोभला | यज्ञ आरंभिला तेणे जेव्हां ||४||
No comments:
Post a Comment