संत मुक्ताबाई निर्याण (वैशाख वद्य १० शके १२१६)
निवृत्ती म्हणे प्रळयींचा वारा | सुटला सारंगधरा ऐसें वाटें ||१||
हालते गगन डोलती विमानें | गेलें देहभान अवघियांचे ||२||
अवघियांचे डोळे झाकले एकदा | मध्यान्ही आंबुदा वळूनी आलें ||३||
निवृत्ती पांडुरंग राही रखुमाबाई | धरा म्हणती घाई मुक्ताई ला ||४||
नामा म्हणे केशवा झाला उबाळा | कांही केल्या डोळा उघडो नेदी ||५||
nivrutti mhane pralayincha vaara vara sutla sharangadhara aise vate
No comments:
Post a Comment