आवाहन

Saturday, April 26, 2014

संत मुक्ताबाई निर्याण (वैशाख वद्य १० शके १२१६)

संत मुक्ताबाई निर्याण (वैशाख वद्य १० शके १२१६)

ऋषि म्हणती हरी पातलेंसे विघ्न | आतां कैंचें प्राण वांचतील ||१||
कोणाची या शुद्धी नाहीचिया कोणा | म्हणती नारायणा मृत्यू आला ||धृ||
कडाडली वीज निरंजनी जेव्हा | मुक्ताबाई तेव्हां गुप्त झाली ||३||
वैकुंठीं लक्षघंटा वाजती एकघाई | झाली मुक्ताबाई स्वरूपाकार ||४||
एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनीं | जेव्हा निरांजनी गुप्त झालीं ||५||
गेलें निवारुनि आकाश अभुट | नामा म्हणें कोठें मुक्ताबाई ||६||

muktabai niryan abhang rushi mhanati hari patalese vighna aata kaiche pran vachatil

No comments:

Post a Comment