देवाच्या प्रसादें करा रे भोजन | व्हाल कोण कोण अधिकारी तें ||१||
ब्रम्हादिकांसी हें दुर्लभ उच्छिष्ट | नका मानू वीट ब्रम्हरसीं ||धृ||
अवघियांपुरतें वोसंडले पात्र | अधिकार सर्वत्र आहे येथें ||३||
इच्छादानी येथे वोळला समर्थ | अवघेची आर्त पुरवितो ||४||
सरे येथें ऐसें नाही कदाकाळी | पुढती वाटे कवळी घ्यावें ऐसें ||५||
तुका म्हणे पाक लक्षुमीच्या हातें | कामारी सांगातें निरुपम ||६||
अभंग क्र.१० (शिरवळकर)
devachya prasade kara re bhajan vhal kon kon adhikari te
No comments:
Post a Comment