हरीच्या जागरणा | जातां कां रे नये मना ||१||
कोठें पाहासील तुटी | आयुष्य वेंचें फुकासाठी ||धृ||
ज्यांची तुज गुंती | ते तों मोकलिती अंतीं ||३||
तुका म्हणे बरा | लाभ काय तो विचारा ||४||
अभंग क्र.१२ (शिरवळकर)
harichya jagarana jata ka re naye mana
No comments:
Post a Comment