गड्यांनो राजा की रे झाला । कृष्ण सिंहासनी बैसला ॥धृ||
पांवा मोहरी घोंगडी । आम्हीं खेळूं यमुने थडी । नाचा पाऊला देहूडी । कृष्ण आमुचा की रे गडी ||२||
खेळू हुतुतू हुंबरी । थडक हाणों टिरीवरी । आतां चालिला दळभारी । आमुचें यशोदेचा हरी ||३||
कुस्ती खेळतां कासाविसी । शेबुंड खरकटे नाकासी । कडे घेउ सावकाशी । आतां बहु भितों यासी ||४||
आम्ही तुम्ही सवें जाऊ । गाई वळावया जाऊ । त्याचे मानेत बुक्या देऊ । जवळी जावयासी भिऊ ||५||
नामा म्हणे चला जाउ । हात जोडोनी उभें राहुं । पाया पडुन मागुन घेऊ । जनींवनीं तोचि कृष्णचि ध्याऊ ||६||
gadyanno raja ki re zala krushna sinhasani baisala pava nama
गौळन उपलब्ध करून दिल्या बद्दल धन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete