शुकसनकादिकीं उभारिला बाहो ।
परिक्षितीला हो दिसां सातां ॥1॥
उठाउठी करी स्मरणाचा धांवा ।
धरवत देवा नाहीं धीर ॥ध्रु.॥
त्वरा जाली गरुड टाकियेला मागें ।
द्रौपदीच्या लागें नारायणें ॥2॥
तुका म्हणे करी बहु च तांतडी ।
प्रेमाची आवडी लोभ फार ॥3॥
No comments:
Post a Comment