माकडें मुठीं धरिलें फुटाणे ।
गुंतले ते नेणे हात तेथें ॥1॥
काय तो तयाचा लेखावा अन्याय ।
हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु.॥
शुकें निळकेशीं गोवियेले पाय ।
विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥2॥
तुका म्हणे एक ऐसे पशुजीव ।
न चले उपाव कांहीं तेथें ॥3॥
No comments:
Post a Comment