आवाहन

Sunday, April 6, 2014


चला वळूं गाई । 
बैसों जेऊं एके ठायीं ॥1॥ 

बहु केली वणवण । 
पायपिटी जाला सीण ॥ध्रु.॥ 

खांदीं भार पोटीं भुक । 
काय खेळायाचें सुख ॥2॥ 

तुका म्हणे धांवे । 
मग अवघें बरवें ॥3॥

No comments:

Post a Comment