आवाहन

Sunday, April 6, 2014


भक्तॠणी देव बोलती पुराणें । 

निर्धार वचनें साच करीं ॥ध्रु 

मागें काय जाणों अइकिली वार्ता । 
कबिरा सातें जातां घडिया वांटी ॥२॥ 

माघारिया धन आणिलें घरासि । 
न घे केला त्यासि त्याग तेणें ॥३॥ 

नामदेवाचिया घरासि आणिलें । 
तेणें लुटविलें द्विजां हातीं ॥४॥ 

प्रत्यक्षासि काय द्यावें हें प्रमाण । 
एकोबाचें ॠण फेडियेलें ॥५॥

बीज दळोनियां केली आराधना । 
लागे नारायणा पेरणें तें ॥६॥

तुका म्हणे नाहीं जयासि निर्धार । 
 नाडेल साचार तोच एक ॥७॥

                                  अभंग क्र.६७(शिरवळकर)

No comments:

Post a Comment