आवाहन

Sunday, April 6, 2014


कुटुंबाचा केला त्याग । 
नाहीं राग जंव गेला ॥1॥ 

भजन तें वोंगळवाणें । 
नरका जाणें चुके ना ॥ध्रु.॥ 

अक्षराची केली आटी । 
जरी पोटीं संतनिंदा ॥2॥ 

तुका म्हणे मागें पाय । 
तया जाय स्थळासि ॥3॥

No comments:

Post a Comment