युक्ताहार न लगे आणिक साधनें ।
अल्प नारायणें दाखविलें ॥1॥
कलियुगामाजी करावें कीर्तन ।
तेणें नारायण देइल भेटी ॥ध्रु.॥
न लगे हा लौकिक सांडावा वेव्हार ।
घ्यावें वनांतर भस्म दंड ॥2॥
तुका म्हणे मज आणि उपाव ।
दिसती ते वाव नामेंविण ॥3॥
No comments:
Post a Comment