देऊळींचा देवो घरभरी भावो । कळसेवीण वावो जातु असे ॥
जाताती वाउगे नटनाट्यसोंगें । चित्तअनुरागें भजतीना ॥
असोनि न दिसे उगयाचि पिसें । घेती वायां वसे सज्जनेवीण ॥
रावोरंक कोहं न म्हणेचि सोहं । साकारलें आहम् न कळे तया ॥
भ्रांतीचेनि भूली वायाचि घरकुली । माया आड ठेली अरे रया ॥
मुक्ताई परेसी दुभतें चहूंसी । सत्रावी सर्वरसीं एका देवें ॥
No comments:
Post a Comment