यशोदे घराकडे चाल मला जेवूं घाल ||धृ||
साध्या गव्हाची पोळी लाटी | मला पुरणपोळी करून दे मोठी |
नाहीं अडवित गुळासाठी | मला जेवूं घाल ||२||
तूप लावून भाकर करी | वांगे भाजून भरीत करी |
वर कांद्याची कोशिंबिरी | मला जेवूं घाल ||३||
आई गे खडीसाखरेचे खडे | लवकर मला करून दे वडे |
बाळ स्फुंदस्फुंदोनी रडे | मला जेवूं घाल ||४||
आई लहानचं घे गे उंडा | लवकर भाजून दे मांडा |
लांब गेल्या गाईच्या झुंडा | मला जेवूं घाल ||५||
आई मी खाईन शिळा घाटा | दह्याचा करून दे मठ्ठा |
नाहीं माझ्या अंगीं ताठा | मला जेवूं घाल ||६||
भाकर बरीच गोड झाली | भक्षुनी भूक हरपली |
यशोदेने कृपा केली | मला जेवूं घाल ||७||
आई मी तुझा एकुलता एक | गाई राखितो नऊ लाख |
गाई राखुनी झिजली नखं | मला जेवूं घाल ||८||
नामा विनवी केशवासी | गाई राखितो वनासी |
जाऊन सांगा यशोदेसी | मला जेवूं घाल ||९||
yashode gharakade chal mala jeu jevu ghal
No comments:
Post a Comment