आवाहन

Sunday, April 27, 2014


गेलीया वृंदावना तेथें देखिला कान्हा | 
सवंगडीया माजीं उभा ध्यान लागलें मना ||१||
हरीनाम गोड झालें काय सांगो गे माय |
गोपाळ वाहती पावे मन कोठें न राहे ||धृ||
त्याचें मुख साजिरें वो कुंडलें चित्त चोरें |
सांडूनी अमृत धणी लुब्धली चकोरे ||३||
सांडूनी ध्रुवमंडळ आली नक्षत्रमाळा |
कौस्तुभा तळवटी वैजयंती शोभे गळां ||४||
सांडूनी मेघराजू कटीसूत्री तळपे विजू |
भुलला चतुरानन तया नव्हे उमजू ||५||
सांडूनि लक्ष्मी निज गोपाळासी बोले गुज |
अचोज हा चोजवेना ब्रम्हदिकां सहज ||६||
वांजट धीट मोठी ऐसी कवण असे खिळू |
भेदली हरिचरणी पायीं मुरडीव वांकी सोज्वळु ||७||
त्याचें पायींची नुपुरें वाजती वो गंभीरे |
लुब्धलिया पक्षी याती धेनू पाचारी स्वरे ||८||

आणिक एक नवल कैसे स्वर्गी देव झाले पिसे |
ब्रम्हादिक उच्छिष्ठालागी देखा जळीं झालें मासे ||९||
आणिक एक नवल परी करी घेउनी शिदोरी |

सवंगड्या वांटीतसे नामया स्वामी मुरारी ||१०||

geliya vrundavana tethe dekhila kanha savangadiya maji ubha dhyan lagale 
lagle mana

No comments:

Post a Comment