आवाहन

Wednesday, April 30, 2014

आम्ही सदैव सुडके । जवळीं येतां चोर धाके | जाऊं पुढतीं भिकें । कुतरीं घर राखती ||१||
नांदणूक ऐसी सांगा । नाहीं तरी वांयां भागा | थोरपण अंगा । तरी ऐसें आणावें ||धृ||
अक्षय साचार | केलें सायासांनी घर | एरंडासी हार | दुजा भार न साहती ||३||
धन कण घरोघरीं | पोट भरे भिकेवरी | जतन तीं करी । कोण गुरें वासरें ||४||
झाली सकळ निश्चिंती | भांडवल शेण माती | झळझळीत भिंती । वृंदावनें तुळसीचीं ||५||
तुका म्हणे देवा | अवघा निरविला हेवा | कुटुंबाची सेवा | तोचि करी आमुच्या ||६||

अभंग क्र-३५ (शिरवळकर)

aamhi sadaiv sudake javali yeta chor dhake jau javu pudhe bhike kutri kutari ghar rakhiti

No comments:

Post a Comment