आवाहन

Wednesday, April 30, 2014

एकादशीस अन्नपान । जे नर करिती भोजन । श्‍वानविष्ठेसमान । अधम जन ते एक ॥१॥
ऎका व्रताचें महिमान । नेमें आचरती जन । गाती ऎकती हरिकिर्तन । ते समान विष्णुसीं ॥धृ॥
अशुद्ध विटाळशीचे खळ । विडा भक्षितां तांबुल । सांपडे सबळ । काळाहातीं न सुटे ॥३॥
सेज बाज विलास भोग । करिती कामिनीचा संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥४॥
आपण न वजे हरिकीर्तना । आणिकां वारी जातां कोणा । त्याच्या पापें जाणा । ठेंगणा तो महामेरु ॥५॥
तया दंडी यमदुत । झाले तयाचे अंकित । तुका म्हणे व्रत । एकादशी चुकलिया ॥६॥

अभंग क्र-१७० (शिरवळकर) 

ekadashi mahatmya ekadashis annapan je nar kariti bhojan shvan vishthesaman adham jan te ek

No comments:

Post a Comment