बाई बाई जाते ग माहेराला । माझ्या मुळच्या घराला ।धृ ।
माझे मुळचे तिन सासरे ।दोन वाईट आहेत खरे ।एक होता गरीब बिचारा ।मानीत नाहि मी त्याला । ।
माझे मुळचे सहा दिर ।काय सान्गु त्याचा कुविचार ।काम क्रोध मद मस्तर ।दंभ अंहकार मजला । ।
माया मोठी सासू धागंङी ।तिला आहे प्रपंचाची गोङी ।येता जाता हानीती थापङी ।मारिते गालाला । ।
आशा मनशा तृष्णा कल्पनेने ।घात केला चोघी जनिने ।वासना मोठी ननंद चावटी ।गान्जीताती मजला । ।
मोठ्या होसेने पति म्या केला ।परी तो बोलत नाही मजला ।जाउनी मोन रूपी राहीला ।जाते तयाच्या घराला । ।
ऐसी मुक्ताई गान्जली । साधू संताशी शरण गेली ।जाउनी मिळाली । आपुल्या स्वरूपाला । ।
No comments:
Post a Comment