आवाहन

Sunday, April 6, 2014



श्री ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठ



अभंग क्र.२६


एकतत्व नाम दृढ धरीं मना । हरीसी करूणा येईल तूझी ||१||

तें नाम सोपें रें राम कृष्ण गोविंद । वाचेसीं सद्‌गद जपें आधीं ||२||

नामापरतें तत्व नाहीं रे अन्यथा | वायां आणिका पंथा जासी झणीं ||३||

ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरीं | धरोनि श्रीहरि जपे सदा ||४||

हरि मुखें म्हणां हरि मुखें म्हणां | पुण्याची गणना कोण करी ||धृ||

haripath ekatatva nam drudh dhari mana harisi karuna yeil tuzi nam 

No comments:

Post a Comment