आवाहन

Sunday, April 6, 2014

खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी । चारितसे धेनु सांवळा जगजेठी ॥1॥
 राधे राधे राधे राधे मुकुंद मुरारी । वाजवितो वेणु कान्हा जगजेठि ॥2॥
 एक एक गौळणी एक एक गोपाळ । हाती धरुनी नाचती रास मंडळा ॥3॥
 एका जनार्दनी रासमंडळ रचिले । जिकडे पाहे तिकडे ब्रह्मचि कोँदले ॥4॥

No comments:

Post a Comment