आवाहन

Sunday, April 6, 2014

तीन अक्षरे निवृत्ति । जो जप करि अहो राति । तया सायुज्यता मुक्ति । ब्रह्मस्थिती सर्वकाळ ॥1॥
 चार अक्षरे ज्ञानदेव । जो जप करिल भाव । तयां ब्रह्मपदी ठाव । ऐसे शिवादी देव बोलिले ॥2॥ 
सोपान हि तीन अक्षरे । जो जप करिल निर्धारे । तयां ब्रह्म साक्षात्कारे । होय सत्वर जाणिजे ॥3॥
 मुक्ताबाई चतुर्विधा । जो जप करिल सदा । तो जाईल मोक्षपदा । सायुज्यसंपदा पावेल ॥4॥
 ऐसी चौदा ही अक्षरे । जो ऐके कर्णविवरे । कि उच्चारि मुखाद्वारे । तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे ॥5॥ 
एका जनार्दनी प्रेमे । जो जप करिल धरिल नेम । तयासि पुन्हा नाहि जन्म । ऐसे पुरुषोत्तम बोलिले ॥6॥

No comments:

Post a Comment