आवाहन

Sunday, April 6, 2014


बोलविसी तैसें आणीं अनुभवा । नाहीं तरी देवा विटंबना ||१|| 

मिठेंविण काय करावें मिष्टान्न । शव जीवेंविण शृंगारिले ||२|| 

संपादणीविण विटंबिले सोंग । गुणेंविण चांग रूपहीन ||३|| 

कन्यापुत्रेंविण मंगळदायकें ।  वेचिलें हें फिके द्रव्य तरी ||४|| 

तुका म्हणे तैसी होते मज परी । न देखे अंतरीं प्रेमभाव ||५||

अभंग क्र-३३४० (शिरवळकर)

bolavisi taise ani anubhava nahi tari deva vitambana

No comments:

Post a Comment