धिग जीणें तो बाइले आधीन ।
परलोक मान नाही दोन्ही ॥1॥
धिग जीणें ज्याचें लोभावरी मन ।
अतीतपूजन घडेचिना ॥2॥
धिग जीणें आळस निद्रा जया फार ।
अमित आहार अघोरिया ॥3॥
धिग जीणें नाहीं विवेक वैराग्य ।
झुरे मानालागीं साधुपणा ॥4॥
तुका म्हणे धिग ऐसे जाले लोक ।
निंदक वादक नरका जाती ॥5॥
No comments:
Post a Comment