आम्हासाठी अवतार । मत्स्यकुर्मादि सूकर ।।१।।
मोहे धाव घाली पान्हा । नाम घेता पंढरिराणा ।।धृ।।
कोठे न दिसे पाहता ।उडी घाली अवचिता ।।३।।
सुख ठेवी आम्हासाठी ।दु:ख आपणची घोंटी ।।४।।
आम्हा घाली पाठीकडे । आपण कळीकाळासी भिडे ।।५।।
तुका म्हणे कृपानिधी ।आम्हा उतरी नावेमधी ।।६।।
अभंग क्र.२८५(शिरवळकर )
No comments:
Post a Comment