त्रिभंगी देहूडा ठाण मांडुनिया माये । कल्पद्रुमातळी वेणु वाजवीत आहे ।।1।।
गोविँदु वो माये गोपाळु वो । सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदु वो ।।2।।
सांवळे सगुण सकळ जीवांचे जीवन । घनानंद मुर्ति पाहतां हारपले मन ।।3 ।।
शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अढळ । बापरखुमादेविवरु विठ्ठलु सकळ ।।4।।
No comments:
Post a Comment