आवाहन

Sunday, April 6, 2014


श्रीराम जन्मकाळाचे अभंग

दशरथ राजा उठिला तेथुनि । कौसल्येचे सदनी जातां झाला ।।1।। 
पाहातसे दृष्टी तेव्हा श्रावणारी । न माये अंतरी तेज तिचे ।।2।। 
तुझिये मानसी होति जे डोहाळे । सांग वो वेल्हाळे मजपाशी ।।3।। 
उदरांत असे भक्तांचा कैवारी । तेथे कैची उरी देहभावा ।।4।।
 सदा समाधिस्थ रामरुप झालीँ । कौसल्या माऊली नामा म्हणे ।।5।।

No comments:

Post a Comment