आवाहन

Sunday, April 27, 2014

बाळ सगुण गुणांचें तान्हें गे | बाळ दिसतें गोजिरवाणें गे |
काय सांगतां गाऱ्हाणे गे | गोकुळींच्या नारी ||१||
श्रीरंग माझा वेडा गे | याला नाहीं दुसरा जोडा गे |
तुम्ही याची संगत सोडा गे | गोकुळींच्या नारी ||धृ||
पांच वर्षाचें माझें बाळ गे | अंगणी माझ्या खेळे गे |
कां लटिकाची घेतां आळ गे | गोकुळींच्या नारी ||३||
सांवळा गे चिमणा माझा | गवळणीत खेळे राजा |
तुम्ही मोठ्या ढालगजा गे | गोकुळींच्या नारी ||४||
तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा गे | आळ घेतां या गोपाळा गे |
तुम्ही ठाईच्या वोढाळा गे | गोकुळींच्या नारी ||५||
तुम्ही लपवूनी याची गोटी गे | लागतां गे याचे पाठीं गे |
ही एवढीच रीत खोटी गे | गोकुळींच्या नारी ||६||
तुम्ही लपवूनी याचा भोवरा गे | आळ घेतां शारंगधरा गे |
तुम्ही बारा घरच्या बारा गे | गोकुळींच्या नारी ||७||
हा ब्रम्हविधीचा जनिता गे | तुम्ही याला धरुं पाहतां गे |
हा कैसा येईल हातां गे | गोकुळींच्या नारी ||८||
नामा म्हणे यशोदेशी गे | हा तुझा हृषीकेशी गे |
किती छळीतो आम्हांसी गे | गोकुळींच्या नारी ||९|| 

bal baal sagun gunanche gunache tanhe ge disate diste disatay gojirvane gojiravane kay sangata garhane gukulichya gukulachya nari naari

No comments:

Post a Comment