प्रा:तकाळी प्रहररात्रीं उठिल्या गौळणी बाळा |
घुसळण मांडीयेंलें घरोघरीं सकळां |
नित्यानंदें परमानंदें गाती गोपाळा |
सहस्त्रापरी कैशा गाती मदन सांवळा ||१||
घुमघुम करिती घुमघुम करिती डेरे घुमती |
आनंदल्या गौळणी छंदे छंदे डोलती ||धृ||
एक म्हणती साजणी तुम्ही लपवा गे लोणी |
न कळे न कळे हो बाई कृष्णाची करणी |
कोणीकडून हा गे येईल सखये चक्रपाणि |
खास खांदुनी तुम्ही आतां लपवा दुधाणी ||३||
बोलतां चालतां इतुक्यामध्यें हरी आला |
कवणेंही नाहीं देव दृष्टी देखिला |
सूक्ष्म रूप धरुनि डेऱ्यामध्ये प्रवेशला |
वरच्यावरी देव लोणी खाऊनियां गेला ||४||
उन्हवणी शिळवणी घालिती परी तें लोणी येईना |
काय झालें ढोणें सासूबाई कळेना ||५||
हा हा गे बायांनों तुमचे जाणतें चाळे |
यशोदेच्या मुला देतसां गोळे |
उगेंचि मग पाहतां आतां फिर गे निराळे |
मारी ठोसरें दोन्ही गाल्होरे घेतले ||६||
डेऱ्यामधुनी मार माझा जगजीवन पाहे |
नामा म्हणे धन्य धन्य वर्णुं मी काये ||७||
pratakkali prahararatri uthilya gaulani bala ghusalan mandiyele gharoghari sakala nityanande paramanande gati gopala sahastrapari kaisha gati madan savala unhavani shilavani ghaliti pari te loni yeina kay zale jhale dhone sasubai kalena
No comments:
Post a Comment