तुजवीण एकली रे कृष्णा न गमे राती । तंव तुवा नवल केले वेणु हाती । आलिये तेचि सोय तुझी वोळखिली गती ।।1।।
नवल हे वालभ रे कैसे जोडिले जीवा । दुसरे दुरी ठेले प्रीति केला रिघावा ।।धृ।।
पारु रे पारु कान्हा झणे करिसी अव्हेरु । तूं तव हृदयीचा होसी चैतन्य चोरु । बापरखुमादेवीवरू विठो करी कां अंगिकारु ।।2।।
No comments:
Post a Comment