आवाहन

Sunday, April 13, 2014

श्री हनुमंत जन्मकाळ अभंग क्र.५

सुवर्च्या नामें स्वर्गीची देवांगना | ब्रम्हशापें जाणा घारी झाली ||१||
अयोध्येचा राजा दशरथ नृपती | यज्ञ पुत्राप्रती करविला ||२||
शृंगी पायसपात्र दिधलें वसिष्ठा हातीं | त्वरें करीजेती तीन भाग ||३||
तीन भाग वसिष्ठे करुनी निश्चिती | दिधले  राणीहाती तीघी तीस ||४||
कैकयी रुसली तेथें विघ्न झालें | घारीनें तें नेलें निजभागा ||५||
एका जनार्दनीं घारी पिंड नेतां | पुढें झाली कथा श्रवण करा ||६||

suvarchya name swargichi devangana jana ghari zali hanuman hanumant maruti

No comments:

Post a Comment