संत तुकाराम महाराजांचा छत्रपती शिवाजी राजांना उपदेश (अभंग ६)
सोन्याचे पर्वत करवती पाषाण | अवघे रानोरान कल्पतरू ||१||
परी या दुर्लभ विठोबाचे पाय | तेथें हे उपाय न सरती ||धृ||
अमृतें सागर भरवती गंगा | म्हणवेल उगा राहे काळा ||३||
भूतभविष्य कळों येईल वर्तमान | करवती प्रसन्न ऋद्धी सिद्धी ||४||
ठानमान कळों येती योग मुद्रा | नेववेल वारा ब्रम्हांडासी ||५||
तुका म्हणे मोक्ष राहे ऐलीकडे | इतर बापुडें काय तेथें ||६||
अभंग क्र.३४१८ (शिरवळकर)
updesh sonyache parvat karavati pashan avaghe ranoran kalptaru shivaji
No comments:
Post a Comment