आवाहन

Sunday, April 13, 2014

श्री हनुमंत जन्मकाळ अभंग क्र.७



घारी मुखीचा पिंड अंजनीच्या करी | पाडतां निर्धारी भक्षियेला ||१||
नव मास होता झाली ती प्रसूत | दिव्य वायुसुत प्रगटला ||२||
वानराचा वेष सुवर्ण कौपीन | दिसती शोभायमान कुंडलें तीं ||३||
जन्मतांची जेणें सूर्यातें धरीयेलें | इंद्रादिकां दिले थोर मार ||४||
अमरपती मारी वज्र हनुवटी | पडिला कपाटीं मेरुचिया ||५||
वायुदेव येवोनि बाळ तो उचलिला | अवघाचि रोधिला प्राण तेथ ||६||
सकळ देव मिळोनी प्रसन्न पै होती | वरदान देती मारुतीसी ||७||
सर्व देव मिळोनी अंजनीसी बाळ | देता प्रात:काळ होता तेव्हां ||८||
तिथी ती पोर्णिमा चैत्रमास जाणा | एका जनार्दनी रूपासी आला ||९|| 

ghari mukhicha pind anjanichya kari padata nirdari bhakshiyela hanumant hanuman maruti

No comments:

Post a Comment