गौळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेसी | दहीं दुध खाऊनियां पळूनी जातो हृषीकेशी ||१||
लाडका हा कान्हा बाई तुझा तुला गोड वाटे | याच्या खोडी किती सांगू महिपत्र सिंधू आटे ||धृ||
मेळवोनी गोपाळ घरामध्ये शिरे कान्हा | धरुं जातां पळूनी जातो यादवांचा राणा ||३||
ऐसें मज यानें पिसें लावियलें सांगू काई | एका जनार्दनीं कायावाचामनें पायीं ||४||
gaulani garhane sangati yashodeshi yashodesi dahi dudh khauniya khavuniya paluni jato hrushikeshi rushekeshi vrushikeshi
No comments:
Post a Comment