आवाहन

Thursday, April 24, 2014

गोकुळीं चोरी करितो चक्रपाणि | गवळणी येऊनि सांगती गाऱ्हाणी | 
येणें माझे भक्षिलें दहीं दुध लोणी | पळोनियां तेथुनी गेला शारंगपाणि वो ||१||
आवरीं आवरीं यशोदे आपुला कान्हा | याच्या खोडी किती सांगू जाणा |
याचें लाघव न कळे चतुरानना | यासी पाहतां मन नुरे मी पणा वो ||धृ||
एके  दिवशीं मी आपुलें मंदिरीं | मंथन करितां देखिता पूतनारी |
जवळी येवोनि रविदंड धरी | म्हणे मी घुसळीतों तू राहे क्षणभरी वो ||३||
परवां आमुचे घरासी आला | संगे घेउनी गोपाळांचा मेळा |
नाचले ऐकत धरी पाहें अचला | धरुं जातां तो पळोनियां गेला वो ||४||
ऐसें बहु लाघव केलें येणें | किती सांगावे तुज गाऱ्हाणे |
एका जनार्दनीं परब्रम्ह तान्हें | यासी ध्यातां खुंटलें येणें जाणें वो ||५||

 gokuli chori karito chakrapani gavalani gaulani yeoni yevuni sangati garhani

No comments:

Post a Comment